Posts

Showing posts from August, 2019

आजचं प्रेम ..?

                     मानवी जीवनामधलं सभोवताली दिसणाऱ्या आजच्या पिढीमधल्या दोन व्यक्तींमधलं प्रेम नावाचं उथळ, पोकळ नातं बघितलं कि खूप वाईट वाटतं. किती म्हणजे किती शून्य करून ठेवलाय या सुंदर भावनेला. Gm ते Gn व Lu ते Mu इथपर्यंत बंदिस्त असणाऱ्या प्रेमाला आजची पिढी प्रेम समजते. असंख्य ह्र्दय या जगात एकत्र येतात. अथांग समुद्राच्या  साक्षीने शेवटच्या श्वशापर्यंत साथ देण्याच्या आणाभाका घेतात. मुक्तपणे एकमेकांच्या सहवासात विहार करतात. अगदी जगाचा विसर पडेपर्यंत प्रेमाच्या दुनियेत वाहत जातात. मनसोक्त भटकतात. मुक्त स्वछंदी उडणाऱ्या पाखरा प्रमाणे प्रेमरूपी आकाशात गरुड झेप घेतात ! निसर्गाच्या सानिध्यात हेच दोन जीव बेमालूमपणे ऐकमेकात मिसळतात, सुखावतात, वेडावतात. हवं तास स्वतःच्या मनाप्रमाणे बेफिकीर आयुष्यातले क्षण आनंदात घालवताना दिसतात. त्या दोन जीवांसाठी एकत्र राहणं म्हणजेच प्रेम !                    कदाचित यात चूक हे काही नसावं परंतु त्याच दोन व्यक्तीना जेव्हा अचानकपणे वेगळा राहण्याची व...