प्लास्टिक नावाचा भस्मासुर
‘भीमाशंकराच्या मस्तकी कचऱ्याची गंगा’ या ‘लोकप्रभा’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखावरील प्रतिक्रिया. प्लास्टिकच्या भस्मासुराचा अक्राळविक्राळ चेहरा आणि त्याचं भयप्रद रूप या प्रतिक्रियेतून आपल्यासमोर येतं. ‘भीमाशंकराच्या मस्तकी कचऱ्याची गंगा’ हा सुहास जोशींचा लेख वाचला. त्यांनी प्लॅस्टिकच्या अर्निबध वापराबाबत लिहिले आहे. अशीच परिस्थिती थोडय़ा फार फरकाने सर्वत्र किल्ले, उद्याने, फारसे प्रसिद्ध नसलेली देवालये. इत्यादी ठिकाणी पाहावयास मिळते. याला कारण प्लास्टिक नावाच्या भस्मासुराचा उदय. १९ व्या शतकाच्या मध्यास औद्योगिक क्रांती घडल्याने सर्व कुटिरोद्योग बंद पडले, शहरे वाढू लागली व बकाल झाली. खेडी ओस पडू लागली. लोक नोकरीसाठी शहराकडे वळू लागले व खुराडय़ात राहू लागले. त्याचप्रमाणे एकविसाव्या शतकात प्लॅस्टिक नावाचा भस्मासुर उदयास आला आहे. या प्लास्टिकने वेष्टन प्रक्रियेत (पॅकेजिंग मटेरियल) फार मोठी क्रांती घडवून आणली आहे. दूध, तेल, कन्फेन्शनरी, रसायने, धान्य, भाजी इत्यादीमध्ये प्लास्टिकचा वारेमाप वापर होत आहे. जसे प्लॅस्टिकचे फायदे आहेत त्याचप्रम...