"अंतराळवीर" कल्पना चावला
अवकाश
आणि अवकाशवीर हा विषय निघाल्यावर कल्पना चावला ची आठवण निघाल्याशिवाय
विषयच पूर्ण होऊ शकत नाही. चला आज जाणून घेऊया कोण होत्या कल्पना चावला आणि
त्यांचे कार्य.
अनेकांना असा गैरसमज आहे कि कल्पना चावला या भारतीय अंतराळवीर होत्या, तसे नसून त्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर होत्या. त्यांचा जन्म १७ मार्च १९६२ मध्ये हरियाणा येथे झाला.

अनेकांना असा गैरसमज आहे कि कल्पना चावला या भारतीय अंतराळवीर होत्या, तसे नसून त्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर होत्या. त्यांचा जन्म १७ मार्च १९६२ मध्ये हरियाणा येथे झाला.
शिक्षण
अंतराळवीर बनण्या साठी नक्कीच त्यांना कठोर परिश्रम करावे लागले. तरीही
त्यांचे शालेय शिक्षण हे गावातीलच शाळेत झाले, वर फक्त उच्च-शिक्षणाच्या
नावाखाली मोठमोठ्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमात मुले भरती करणाऱ्यांसाठी
हे एक उदाहरण ठरू शकते. पंजाब मध्येच १९८२ साली एरोनॉटिकल अभियांत्रिकीची
पदवी मिळवली. १९८४ मध्ये टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल
उच्च-अभियांत्रिकी शिक्षण घेतले आणि १९८८ साली कोलोरॅडो विद्यापीठातून
एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून डॉक्टरेट मिळवली.
कार्य
१९८८ मध्ये त्यांनी नासा एम्स रिसर्च सेंटर मध्ये Vertical/Short Takeoff
and Landing वर संगणकीय द्रव प्रेरक शक्ती [ Computational fluid dynamics
(CFD) ] चे संशोधन केले. १९९३ मध्ये त्या ओवरसेट मेथड्स व्हाईस प्रेसिडेंट
आणि संशोधक म्हणून रुजू झाल्या. १९९१ मध्ये अमेरिकेचं नागरिकत्व
स्वीकारल्यावर त्यांनी नासा ऍस्ट्रोनात कॅम्प मध्ये मध्ये भरती होण्याचा
अर्ज केला होता. त्या मार्च १९९५ मध्ये कॉर्पस मध्ये निवडल्या गेल्या व
१९९६ मध्ये त्यांची १५ व्हा अंतराळवीर समूहात उड्डाणासाठी निवड झाली. विना
गुरुत्वाकर्षणाच्या पोकळीत प्रवास करताना त्या म्हणाल्या होत्या “तुमची
बुद्धिमत्ता हेच तुम्ही आहेत” [“You are just your intelligence”]. त्यांनी
१०६.७ लाख किमी ३७६ तास व ३४ मिनिटे प्रवास केला, जो पृथ्वीच्या परिघाच्या
२५२ पट आहे.
Comments
Post a Comment