बाप
1) स्वतः डब्बा मोबाईल वापरून मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो… स्वतः फाटकी चप्पल घालतो पण पोराला नवीन बूट घेऊन देतो… —–तो एक बाप असतो….. 2) सोसताना वेदना मुखातून एक शब्द नेहमी येई प्रेमाचा पाझर पसरून त्या वेदनेवर वेदना नाहिशी करते आई… 3) वडील म्हणजे एक अशी व्यक्ती… जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता, तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता, तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता, आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता… 4) यशाच्या आकाशात गरूड होऊन जेव्हा आपण भरारी मारत असू. पृथ्वीवर दोन आतूर डोळे जग विसरून पहात असतील. ते दोन डोळे म्हणजे आपले आई-वडील. . 5) मला माझ्या मित्राने विचारले कि प्रेम म्हणझे नेमके काय ? मी त्याला सागितले की, कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम… दिवाळीला स्वतःसाठी कपडे न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम… कितीही मस्...