Posts

Showing posts from September, 2018

कोकणातील गणेशोत्सव

Image
कोकणात पावसाळी हंगामात चोहीकडे हिरवाई असते. भातशेतीने सर्वत्र वातावरणात एक वेगळीच नजाकत आलेली असते. श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणूनच त्याचा आनंद घेतला जातो श्रावण सरल्यावर येणा-या भाद्रपद महिन्यातच कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून गणेशोत्सव साजरा केला जातो. ऋण काढून सण साजरा करण्याचे कोकणातील माणसांचे स्वभावगुण वैशिष्टय़ आहे. पंचवीस- तीस वर्षापूर्वी आजच्या इतकी दळणवळणाची साधने प्रगत झाली नव्हती. कोकणातील नोकरी- व्यवसायानिमित्त मुंबईत असणा-यांना एस.टी.च्या गाडयांनीच प्रवास करावा लागे. ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळेही आजच्या इतके विणले गेले नव्हते. अनेक गावातून रस्ता, पूल नसल्याने होडीनेच आणि ओहोळावरच्या साकवावरून कसरत करावी लागत पायवाटेने गावातलं घर गाठावे लागे. तीस वर्षापूर्वी अवघे कोकण मुंबईत नोकरी-व्यवसायात असणा-या प्रत्येक घरातील एखाद्याच्या येणा-या मनीऑर्डरवरच सारे कुटुंब अवलंबून होते. मातीच्या नळ्याची आणि कौलारू असणारी घरं, मातीच्या भिंती त्या देखील सिमेंटच्या प्लास्टरलाही मागे काढतील इतक्या सुबक होत्या. गावोगावच्या घराकडे जाण्यासाठी पायवाट होती. रस्तेही ...