गुरू का करावा
आजपर्यंत आपण आयुष्यात सगळ्या गोष्टी कोणा ना कोणाकडून शिकत आलेले असतो. प्रत्येक वयात आपला आदर्श बदलत असतो, आपला आयुष्याचा दृष्टिकोन बदलत असतो, आपल्या आवडी निवडी बदलत असतात तसेच आपले शिक्षक सुद्धा बदलत असतात. काही जण गुरू आणि शिक्षक ह्यात खूप गल्लत करतात. शिक्षक हा ठराविक वेळी ठराविक विषयाचं मार्गदर्शन करत असतो परंतु गुरू तुम्हाला पुस्तका बाहेरचं जग दाखवून त्यामध्ये जगायला शिकवत असतात. शिक्षक शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी पर्यंत सोबत असतात पण गुरू तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असतात. गुरू तुम्हाला आयुष्यात येणाऱ्या अनेक चढ उतारांमध्ये जगण्याचे कौशल्य शिकवत असतात. आयुष्यात योग्य दिशेने चालायचे शिक्षण देतात. ते मार्ग दाखवतात आपण विश्वास ठेऊन पुढे जायचं असतं. गुरूकृपेने आणि मार्गदर्शनामुळे आपल्याला हवं असलेलं आयुष्यात मिळवू शकतो. गुरू प्रत्येक दुःखात पाठीशी उभे असतात मात्र त्यासाठी आपल्याकडे ती बघायची दृष्टी लागते. आजकाल लोकं गुरूंवर सुद्धा टिका टिपन्नी करतात. कारण ह्यांना 100 टक्के प्रत्येक गोष्टीची ख...