प्रेम (कविता)

 प्रेम 

प्रेमाला नाही ना पैशाचं, ना वयाचं बंधन,
ते असतं हृदयातलं नातं, एक सुंदर भावनेचं स्पंदन।

ना श्रीमंत-गरीब, ना रंग-रूपाचं मोल,
प्रेमात असतो नजरेतल्या शांततेचा एक अनमोल संवाद खोल।

प्रेम म्हणजे नजऱांनी न सांगता समजणं,
दुःखाच्या क्षणी हात धरून सोबत चालणं।

प्रेम म्हणजे रुसवे-फुगवे, पण तरीही न सुटलेली साथ,
मनात खोलवरं रुजलेली, ती विश्वासाची वाट।

प्रेम म्हणजे शांत रात्रीचं हसू, आणि
मनातली न बोलता दिलेली साथ।

प्रेमात नसतो गर्व, ना स्पर्धेचा गंध, फक्त दोन जीवांचा,
असतो निखळ श्वास आणि मंद स्पर्शाची सुगंध।

प्रेमाचा अर्थ नसतो शब्दांत, ते समजतं फक्त
नजरेतल्या आणि मनातल्या स्पंदनांत।

                                    Sumesh...

Comments

Popular posts from this blog

" स्वच्छतेचे महत्व "

प्लास्टिक नावाचा भस्मासुर

पाण्याचे महत्त्व जाणा