आई
आई
पण मग तो दिवस येतो, जेव्हा आपण शिक्षणासाठी किंवा नोकरी साठी घरा बाहेर पडतो. आता कोणी ओरडायला नाही, किती मज्जा ना. असते खरंच मजा, पण पहिले दोन दिवस फक्त. आणि मग ते मेस चे जेवण, चुकून कापलेलं बोट, आईची आठवण काढते. आता तर मोठे झालो आहोत म्हणून अश्रू रोखतो, पण नंतर ढसा ढसा रडतो. घराचे वेध लागतात. कॉलेज सुरु होऊन चार दिवस नाही झाले तर लगेच घराकडे पळ काढतो. आई शेवटी आई असते, तिला कळत तुम्ही का आला आहात, तुम्ही आता मोठे झालात, मान्य करणार नाही की आईची आठवण आली. पण आईला ते माहित असत. बाबा ओरडतात, आई काहीही बोलत नाही. स्वयंपाक घरात तुमचे आवडते जेवण, गोड धोड बनवत असते. अशी असते आई.
पण आताच्या आधुनिक जगात आपण इंटरनेट, सोशिअल मीडिया च्या जाळयात असे काही गुंततों की आई वडिलांचे प्रेम कधी कळतच नाही. ज्यांनी हजारो रुपये भरून, दागिने गहाण ठेवून, कर्ज काढून इंग्लिश मिडीयम शाळेत टाकले अशा आई, वडिलांना इंग्रजी येत नसेल तर आपल्याला त्यांची लाज वाटते. सोशिअल मीडिया वर कूल वाटण्यासाठी, हैप्पी मदर्स डे ची आई सोबतची सेल्फी पोस्ट करतो, पण आईला कधी सामोरा-समोर विश करत नाही. आई स्वयंपाक घरात भांडी घासत असते आणि आपण सेल्फी वरचे लाइक्स मोजत असतो. एक प्रश्न विचार स्वतःला, आई वडिलांची किंमत मात्र सेल्फी एवडीचं राहिली आहे का?
भाग्यवान आहोत की आपल्याला प्रेम करणारे आई वडील आहेत, जरा विचार करा त्या अनाथ मुलांचा. त्यांना विचारा आई वडिलांची किंमत. उद्या आपण मोठे होऊ, आज ना उद्या ती आपली साथ सोडून जाईल, तेव्हा रडत बसण्यापेक्षा आज आपल्या आईवरचे प्रेम व्यक्त करा. तिला घर कामात थोडी मदत करा, भाजीची जड पिशवी तिच्या हातातून घ्या. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तिला खूष करतील. जेव्हा कमवायला लागल तेव्हा पहिल्या पगारातून आई साठी एक साडी आणा. तिला साडीच कौतुक नसते, तिला तुमचं प्रेम कळत त्यातून.
पैसे कमावण्याच्या, मोठे होण्याच्या स्पर्धेत तुम्ही आई वडिलाना विसरून जाता, त्यांच्या कडे दुर्लक्ष करता. तुम्ही कितीही मोठे व्हा, जग जिंका पण जर का तुमची आई तुमच्या सोबत नाही तर, ते सगळं निरर्थक वाटत.
म्हणून, परत एकदा म्हणतो “स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी”
Comments
Post a Comment