आजचं प्रेम ..?

                     मानवी जीवनामधलं सभोवताली दिसणाऱ्या आजच्या पिढीमधल्या दोन व्यक्तींमधलं प्रेम नावाचं उथळ, पोकळ नातं बघितलं कि खूप वाईट वाटतं. किती म्हणजे किती शून्य करून ठेवलाय या सुंदर भावनेला. Gm ते Gn व Lu ते Mu इथपर्यंत बंदिस्त असणाऱ्या प्रेमाला आजची पिढी प्रेम समजते. असंख्य ह्र्दय या जगात एकत्र येतात. अथांग समुद्राच्या  साक्षीने शेवटच्या श्वशापर्यंत साथ देण्याच्या आणाभाका घेतात. मुक्तपणे एकमेकांच्या सहवासात विहार करतात. अगदी जगाचा विसर पडेपर्यंत प्रेमाच्या दुनियेत वाहत जातात. मनसोक्त भटकतात. मुक्त स्वछंदी उडणाऱ्या पाखरा प्रमाणे प्रेमरूपी आकाशात गरुड झेप घेतात ! निसर्गाच्या सानिध्यात हेच दोन जीव बेमालूमपणे ऐकमेकात मिसळतात, सुखावतात, वेडावतात. हवं तास स्वतःच्या मनाप्रमाणे बेफिकीर आयुष्यातले क्षण आनंदात घालवताना दिसतात. त्या दोन जीवांसाठी एकत्र राहणं म्हणजेच प्रेम !
                   कदाचित यात चूक हे काही नसावं परंतु त्याच दोन व्यक्तीना जेव्हा अचानकपणे वेगळा राहण्याची वेळ येते तेंव्हा मात्र त्यांच्यातलं प्रेम कच खात रोज न चुकता केले जाणारे Gm, Gn, Lu, Mu मेसेज बंद झाले कि त्यांच्यातलं प्रेम कोरड पडत जाताना दिसत. मग ते दुसर्यामध्ये गुंततात. काही काही जोड्या तर अशा ही पहिल्या आहेत कि Gm,Gn चा मेसेज नाही केला म्हणून ब्रेकअप करतात. रोज दिसणं जवळ राहणं, खाण-पिन, सोबत फिरणं म्हणजे प्रेम का ? रोज रात्री - अपरात्री चॅटिंग करण फोन वर बोलणं म्हणजे प्रेम का ? ऐकमेकांना गिफ्ट देणं-घेणं म्हणजे प्रेम का ? एकमेकांकडे बघून आकर्षित होणं म्हणजे प्रेम का ? असं प्रेम पिल्लू , बाबु, बच्चा, सोनू , सोन्या म्हणण्यापुरतंच मर्यादित असत का? त्यापलीकडची प्रेम नावाची सुंदर भावना खरंच किती जणांना समजलेली असते?
                    इतिहासात डोकावून पाहिलं कि अभिमानाने उर भरून येतो ! येसूबाई व संभाजी राजेंचं प्रेम बघितलं कि डोळे आनंदाश्रुनी भरून पावतात ! कुठचाही मागचा पुढचा विचार न  करता स्वराज्यासाठी आपल्या पत्नीला येसूबाईंना एकटं सोडून लढाईवर जाणारे शंभूराजे बघितले कि समजत खरं प्रेम व आपल्या पतीसाठी, स्वराज्यासाठी हवं ते करण्याची धमक येसू बाईंच्या नजरेत पाहिलं कि समजत 'त्याग' म्हणजे प्रेम....!
                   याउलट आजच्या तरुणाईचा प्रेमाचा प्रवास भटकलेला दिसून येतो. आयुष्यात खरं-खोटं, माझं-तुझं, भेटी-गाठी, गिफ्ट देणं- घेणं, शारीरिक आकर्षण या पैकी कुठल्याच बंधनात न अडकता एका बिरुदा पलीकडे जाऊन एखाद्या व्यक्ती बदल सहज, सुंदर अशी निर्मल भावना तर तुमच्या मनात शिल्लक राहत असेल तर  तर खार प्रेम समजावं. हेच ते प्रेम जे ओठांवर हास्य फुलवत, मुक्ततेचा आनंद देत जगणं खऱ्या अर्थाने समृद्ध करत !
                  "जीवापाड प्रेम " या शब्धच अर्थच जीवजाई पर्यंत असा होतो ! जे प्रेम मरण, यातना देत नाही त्याला प्रेम तरी कस म्हणावं..? ते म्हणतात ना प्रेमात आणि मरणात स्व उरत नाही ते अगदी खरच ! एखाद्या सुवासिक फुलाचा सुगंध अत्तरासारखा उडून जावा असा या प्रेमाला अर्थ तरी काय....? उलट ते सुकलेले फुल कायम जपून ठेवावं वहीच्या पानात कधी कठोर झालंच ह्र्दय तर आठवण  करून देत ते फुल काळजातल्या प्रेमाची असं प्रेम खऱ्या अर्थाने दोन व्यक्तींना जागवत असत, ना कि जीव घेत असत  ! अशा  नात्यातली एकनिष्ठता, एकवाक्यता, स्पष्ठता, विश्वास सहजसहजी तुटणं अवघड असतं !
                  दोन भिन्न व्यक्तींनी दोन वेगवेगळ्या पाऊलवाट असतांनाही, अंतर असतानाही एकमेकांच्या सुखासाठी एका अदृश्य भावनांचा विचार करणे म्हणजेच खऱ्या प्रेमाची अनुभूती मिळणे होय ! सोबत राहणं,फिरणं,दिसणं, आकर्षित होणं मुळी प्रेम नसतंच. सहवास हवा असतो पण विरह खऱ्या अर्थाने प्रेमाची जाणीव करून देतो व सहवास लाभावच असं काही नसत दोन माणसांमधली "मनाची ओढ" नात्यातलं अंतर कमी करते. शांत शेळके यांच्या ओळींना साजेसच हे प्रेम असत..!
                    "दुरातही नसावा दोघांमध्ये दुरावा
                     स्पर्शविना सुखाने हा जीव 
                            मोहरावा 
                     ओठी फुलून यावे  स्मित गोड 
                            सार्थकाचे 
                     विश्वाहुनी निराळे हे विश्व
                           प्रेमिकांचे"
शेवटी प्रेम हे निस्वार्थ भावना आहे. अफाट अमर्याद, अनंताकडे नेणारी जगणं समृद्ध करणारी फक्त ती उमजायला हवी.

Comments

Popular posts from this blog

" स्वच्छतेचे महत्व "

प्लास्टिक नावाचा भस्मासुर

पाण्याचे महत्त्व जाणा