शेवटची भरारी” ✈️🕊️
आकाशात घेतली भरारी,
स्वप्नांची होती तयारी…
ते विमान नव्हतं प्रवासाचं साधन,
ते होतं आशा, विश्वास आणि नव्या स्वप्नांचं वाहन…
क्षणभर सगळं थांबलं, गगनात
काहीतरी काळं सावट पसरलं…
एक क्षण… आणि शांतता दाटली,
उंच भरारी तिथंच विरून गेली…
उडताना वाटलं उगम होईल नवा,
पण नशिबानं लिहिलं होत शेवटचं पान तेंव्हा…
अधुरीच राहिली आयुष्याची गाथा,
भरारी झाली वेदनेची शेवटची दिशा…
ना कुठला अलार्म, ना कुठला इशारा,
फक्त एक न सांगता आलेला निरोप सारा…😞🙏🏻💐
✍🏻 Sumesh
Comments
Post a Comment