बाप…
मी जे मागेन ते मला मिळेलच हा विश्वास म्हणजेच बाप
आयुष्याच्या वाटेवर हरलेल्या स्वप्नांचा आधार म्हणजे बाप
स्वता अशिक्षित असून सुद्धा तुमच्या चांगल्या शिक्षणासाठी धावतो तो बाप स्वतःच्या शर्टाला पडलेली भोक तुमच्या स्वप्नांनी भरतो तो बाप
ज्यामध्ये आयुष्यातले अनुभव लिहिले जातात ते पुस्तक म्हणजेच बाप
बाप म्हणजेच आपल्या आयुष्यातील असं व्यक्तिमत्त्व जे कोणत्याच मापात आपल्याला मोजता येणार नाही.
निलम...✍🏻
Comments
Post a Comment