Posts

होळी स्पेशल

डिजिटल दुनियेत हरवत चाललेली माणुसकी…

  पूर्वीची ती शांत संध्याकाळ… मोकळ्या अंगणात झालेल्या मनमोकळ्या गप्पा, सोबतीत घेतलेला गरम चहा हे सगळं आज “ Notification,”च्या गर्दीत कुठेतरी हरवलंय. इंटरनेटच्या या झगमगत्या दुनियेत, माणसं एकमेकांशी बोलणं विसरत चालली आहेत. संवाद आहे खरा – पण तो फक्त फोनवर, स्टोरीमध्ये आणि स्टेटसमध्ये! समोरासमोर बसून, डोळ्यांत पाहून बोलायचं थांबलंय… पूर्वी नजरेत संवाद असायचा, आज तो फक्त नेटवर्कवर आहे. आज कळेनासं झालंय की आपण फोन हाताळतोय की फोनच आपल्याला? लोक प्रेम स्टेटसवर दाखवतात, काळजी स्टोरीत व्यक्त करतात, आणि साथ फक्त Reels मध्येच दिसते. Nice, Love it, So sweet अशा कमेंट्स केल्या की खरंच प्रेम व्यक्त होतं का? की हे सगळं फक्त स्क्रीनपुरतं नातं आहे? मनात काय चाललंय, हे समजायला आज लाईक्स आणि इमोजीच पुरेसे मानले जातात… पण विचारपूस,आणि डोळ्यांतली ती जिव्हाळ्याची भावना – ती आता कुठे आहे? बहुतेक तीही नेटवर्कच्या सिग्नलमध्ये हरवून गेली आहे… आपण ऑनलाईन नाती निर्माण करतोय, पण खरा प्रश्न असा आहे  ही नाती आपल्या अडचणीच्या क्षणी आपल्यासाठी उभी राहतील का? आपल्या सुख-दुःखात खऱ्या अर्थानं सहभागी होतील का? ...

बाप…

  मी जे मागेन ते मला मिळेलच हा विश्वास म्हणजेच बाप  आयुष्याच्या वाटेवर हरलेल्या स्वप्नांचा आधार म्हणजे बाप   स्वता अशिक्षित असून सुद्धा तुमच्या चांगल्या शिक्षणासाठी धावतो तो बाप   स्वतःच्या शर्टाला पडलेली भोक तुमच्या स्वप्नांनी भरतो तो बाप   ज्यामध्ये आयुष्यातले अनुभव लिहिले जातात ते पुस्तक म्हणजेच बाप   बाप म्हणजेच आपल्या आयुष्यातील असं व्यक्तिमत्त्व जे    कोणत्याच मापात आपल्याला मोजता येणार नाही.                                                              निलम...✍🏻

शेवटची भरारी” ✈️🕊️

आकाशात घेतली भरारी, स्वप्नांची होती तयारी…  ते विमान नव्हतं प्रवासाचं साधन, ते होतं आशा, विश्वास आणि नव्या स्वप्नांचं वाहन…  क्षणभर सगळं थांबलं, गगनात  काहीतरी काळं सावट पसरलं…  एक क्षण… आणि शांतता दाटली,  उंच भरारी तिथंच विरून गेली…  उडताना वाटलं उगम होईल नवा, पण नशिबानं लिहिलं होत शेवटचं पान तेंव्हा…  अधुरीच राहिली आयुष्याची गाथा, भरारी झाली वेदनेची शेवटची दिशा…  ना कुठला अलार्म, ना कुठला इशारा, फक्त एक न सांगता आलेला निरोप सारा…😞🙏🏻💐                                                 ✍🏻 Sumesh

प्रेम (कविता)

  प्रेम  प्रेमाला नाही ना पैशाचं, ना वयाचं बंधन, ते असतं हृदयातलं नातं, एक सुंदर भावनेचं स्पंदन। ना श्रीमंत-गरीब, ना रंग-रूपाचं मोल, प्रेमात असतो नजरेतल्या शांततेचा एक अनमोल संवाद खोल। प्रेम म्हणजे नजऱांनी न सांगता समजणं, दुःखाच्या क्षणी हात धरून सोबत चालणं। प्रेम म्हणजे रुसवे-फुगवे, पण तरीही न सुटलेली साथ, मनात खोलवरं रुजलेली, ती विश्वासाची वाट। प्रेम म्हणजे शांत रात्रीचं हसू, आणि मनातली न बोलता दिलेली साथ। प्रेमात नसतो गर्व, ना स्पर्धेचा गंध, फक्त दोन जीवांचा, असतो निखळ श्वास आणि मंद स्पर्शाची सुगंध। प्रेमाचा अर्थ नसतो शब्दांत, ते समजतं फक्त नजरेतल्या आणि मनातल्या स्पंदनांत।                                             Sumesh...

..........जात..........

 जातीचं काय घेऊन बसलात राव अरे जात म्हणजे काय ? 👌 माहित तरी आहे का..? अरे कपडे शिवणारा शिंपी, ! तेल काढणारा तेली, ! केस कापणारा न्हावी.! लाकुड़ तोडणारा सुतार.! दूध टाकणारा गवळी.! गावोगावी भटकणारा बंजारा.! पुजा-अर्चा, पौरोहित्य करणारा ब्राह्मण.! वृक्ष लावणारा माळी.! आणि लढाई लढणारा क्षत्रिय.! आलं का काही डोस्क्यात..? आरं काम म्हणजे जात. आता भांडत बसण्यापेक्षा जाती बदला. आता इंजीनीयर ही नवी जात . कॉम्प्यूटर, केमिकल ही पोटजात. "सी. ए" ही पोटजात, "एम. बी. ए" ही नवी जात. बदला की राव कवाचं तेच धरुन बसलात! घरीच दाढी करता नवं?  मग काय न्हावी का? बुटाला पालीश करता नव्हं? मग काय चांभार का? गैलरी टेरेस वर झाडे लावता ना ! मग माळी का? घरच्या घरीच पुजा-अर्चा करता नव्ह?..,,मग ब्राम्हण का ? दूध टाकणारा मुलगा गवळी का? आरं बायकोच्या धाकानं का हुईना संडास साफ करता नव्हं? आता अजून बोलाया लावू नका ! आरं कोण मोठा कोण छोटा?  ह्याला बी दोन हात त्याला बी दोनच नव्हं? ह्यालाबी खायला लागतं आणि त्याला पण? आरं कामानं मोठं व्हा जातीनं न्हाय! आरं तुम्ही ह्या जातीत जन्माला आला,  हा काय तुमचा पराक्...

चापेकरांच्या रँडवध पराक्रम

 ★चापेकरांच्या रँडवध पराक्रमाला आज १२४ वर्षे पूर्ण झाली★ एका घरातील तीन सख्खी भावंडे देशकार्यार्थ फासावर जातात ही सोपी गोष्ट नव्हे....यासाठी त्यांना कोणी आमिष दाखवले नव्हते वा त्यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी अथवा बक्षीस मिळणार नव्हते...असे असूनही देशासाठी घरच्या लोकांची पर्वा न करणारे हे क्रांतिवीर कोणत्या मुशीतून घडले असतील असा प्रश्न आजची अवस्था पाहून मनात दाटून येतो...यांच्या माघारी घरात राहिले ते वृद्ध वडील,तीन विधवा आणि तीन लहान मुले...!! सर्व समाजाने तर जणू देशभक्तीच्या अपराधास्तव यांना वाळीत टाकले होते...मदत केली तर सरकार आपले काय करील,या भीतीने कोणी सहाय्यासाठी येत नव्हते...अशा वेळी लोकमान्यांनी मदत केली...स्वराज्य मिळाल्यावरही थोरल्या चापेकरांची पत्नी जिवंत होती...१९५६ मध्ये त्या गेल्या....पण सरकारने त्यांना ताम्रपट वगैरे दिला नाही...कारण एकच अपराध...त्यांचा पती सशस्त्र क्रांतिकारक होता...कोणी सत्याग्रही नव्हता....!! आज जातीयद्वेषाच्या काळात तर पुन्हा एकदा या क्रांतीवीरांवर त्यांची जात काढून चिखलफेक होते...आणि आम्ही हे सर्व पाहतोय.....!! ज्यांनी सर्व देशवासीयांसाठी आपल...

🌹प्रवचनाचा विषय🌹

          🟠🟣🟠गुरु कशाला हवा❓🟠🟣🟠 💠व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरू करावा लागतो, तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरू नको असे म्हणून कसे चालेल❓💠 ❄प्रपंचात सुखदुःख झाले, समाधान मिळाले नाही, तर मग खरे सुख कुठे आहे आणि ते मला कोण दाखवील, अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरू करील. ❄ ✴प्रपंच आम्हाला कडू वाटला तरच शिष्य होण्याचा प्रश्न. शिकावे असे ज्याच्या मनात येते तो शिष्य, आणि जो शिकवितो तो गुरू. मला काही कळत नाही असे ज्याला वाटतो तोच गुरू करील.✴ 🔸️मी 'राम राम' म्हणतो, वाईट मार्गाने जात नाही, मग गुरू कशाला हवा, असे काहीजण म्हणतात. 'मी' केले ही जाणीव आड येते, म्हणून सद्गुरूची आवश्यकता आहे. सत्कर्माचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामाचा विसर नाही का पडला❓अभिमान गेल्याशिवाय राम नाही भेटणार.🔸️ 🏵देवाजवळ गेला तरी नामदेवाचा अभिमान नाही गेला, म्हणून भगवंतांनी त्याला 'गुरू कर' म्हणून सांगितले.🏵 💢संतांच्या कृपेने दुखणे बरे झाले म्हणून त्याला मानणे हे खरे नव्हे. जो शिष्याला विषयात ओढील त्याला गुरू कसे म्हणावे❓जो काही चमत्कार करून दाखवील त्याला आम्ही बुवा म्हणतो. सं...