Posts

Showing posts from July, 2025

डिजिटल दुनियेत हरवत चाललेली माणुसकी…

  पूर्वीची ती शांत संध्याकाळ… मोकळ्या अंगणात झालेल्या मनमोकळ्या गप्पा, सोबतीत घेतलेला गरम चहा हे सगळं आज “ Notification,”च्या गर्दीत कुठेतरी हरवलंय. इंटरनेटच्या या झगमगत्या दुनियेत, माणसं एकमेकांशी बोलणं विसरत चालली आहेत. संवाद आहे खरा – पण तो फक्त फोनवर, स्टोरीमध्ये आणि स्टेटसमध्ये! समोरासमोर बसून, डोळ्यांत पाहून बोलायचं थांबलंय… पूर्वी नजरेत संवाद असायचा, आज तो फक्त नेटवर्कवर आहे. आज कळेनासं झालंय की आपण फोन हाताळतोय की फोनच आपल्याला? लोक प्रेम स्टेटसवर दाखवतात, काळजी स्टोरीत व्यक्त करतात, आणि साथ फक्त Reels मध्येच दिसते. Nice, Love it, So sweet अशा कमेंट्स केल्या की खरंच प्रेम व्यक्त होतं का? की हे सगळं फक्त स्क्रीनपुरतं नातं आहे? मनात काय चाललंय, हे समजायला आज लाईक्स आणि इमोजीच पुरेसे मानले जातात… पण विचारपूस,आणि डोळ्यांतली ती जिव्हाळ्याची भावना – ती आता कुठे आहे? बहुतेक तीही नेटवर्कच्या सिग्नलमध्ये हरवून गेली आहे… आपण ऑनलाईन नाती निर्माण करतोय, पण खरा प्रश्न असा आहे  ही नाती आपल्या अडचणीच्या क्षणी आपल्यासाठी उभी राहतील का? आपल्या सुख-दुःखात खऱ्या अर्थानं सहभागी होतील का? ...

बाप…

  मी जे मागेन ते मला मिळेलच हा विश्वास म्हणजेच बाप  आयुष्याच्या वाटेवर हरलेल्या स्वप्नांचा आधार म्हणजे बाप   स्वता अशिक्षित असून सुद्धा तुमच्या चांगल्या शिक्षणासाठी धावतो तो बाप   स्वतःच्या शर्टाला पडलेली भोक तुमच्या स्वप्नांनी भरतो तो बाप   ज्यामध्ये आयुष्यातले अनुभव लिहिले जातात ते पुस्तक म्हणजेच बाप   बाप म्हणजेच आपल्या आयुष्यातील असं व्यक्तिमत्त्व जे    कोणत्याच मापात आपल्याला मोजता येणार नाही.                                                              निलम...✍🏻

शेवटची भरारी” ✈️🕊️

आकाशात घेतली भरारी, स्वप्नांची होती तयारी…  ते विमान नव्हतं प्रवासाचं साधन, ते होतं आशा, विश्वास आणि नव्या स्वप्नांचं वाहन…  क्षणभर सगळं थांबलं, गगनात  काहीतरी काळं सावट पसरलं…  एक क्षण… आणि शांतता दाटली,  उंच भरारी तिथंच विरून गेली…  उडताना वाटलं उगम होईल नवा, पण नशिबानं लिहिलं होत शेवटचं पान तेंव्हा…  अधुरीच राहिली आयुष्याची गाथा, भरारी झाली वेदनेची शेवटची दिशा…  ना कुठला अलार्म, ना कुठला इशारा, फक्त एक न सांगता आलेला निरोप सारा…😞🙏🏻💐                                                 ✍🏻 Sumesh